

Xiaomi Diwali Sale 2026: Up to 50% Off on Redmi & Xiaomi Phones
esakal
Xiaomi Diwali Sale 2026: ऐन सणासुदीच्या काळात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमीने (Xiaomi) आपल्या वार्षिक 'Diwali with Xiaomi Sale 2026' ची घोषणा केली आहे. हा भव्य सेल 8 ऑक्टोबर 2026 पासून अधिकृतपणे सुरू होत आहे.
या सेलमध्ये कंपनी आपल्या वेगवेगळ्या स्मार्टफोन्स आणि गॅजेट्सवर तब्बल 50% पर्यंतचा डिस्काउंट देत आहे. यामध्ये ग्राहकांना थेट 15,000 रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय खरेदी अधिक सुलभ करण्यासाठी कंपनीने एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट ईएमआय (No-Cost EMI) यांसारखे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.