
Xiaomi Fan Days Sale : पूर्वी दमदार कॅमेरा, रॅम, स्टोरेज असणारा स्मार्टफोन हा महागच असायचा, पण नंतर सर्वच कंपन्यांनी ग्राहकांच्या गरजा ओळखून बजेट फोन तयार करण्यास सुरुवात केली. पण याची सुरुवात करणाऱ्या कंपन्यांतील एक म्हणजे शाओमी.
शाओमी ज्याला रेडमी नावाने ही ओळखलं जातं, त्यांनी मार्केटमध्ये बजेट फोन आणण्यास सुरुवात केली. स्वस्तात मस्त फोन तयार करणारी ही कंपनी आता सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करत असून यामध्ये लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बँड, पॉवर बँक असं सारंकाही आहे.
विशेष म्हणजे आता या शाओमी कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सच्या खरेदीवर दमदार सूट कंपनीने देऊ केली आहे. ४ मे पासून कंपनीचा Xiaomi Fan Days हा सेल सुरु झाला असून १० मे पर्यंत असणाऱ्या या सेलमध्ये ३८,००० पर्यंतची सूटही मिळवू शकता. तर सेलमधील डिस्काउंटबद्दलच्या काही खास गोष्टी पाहूया...
Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोन अवघ्या २१,४९९ रुपयांना
Redmi Smart TV 32 HD Ready स्मार्टटीव्ही केवळ ९,४९९ रुपयांना
Redmi Smart TV X43 टीव्हीची किंमत २२,४९९ रुपये
Xiaomi Pad 5 ची किंमत सेलमध्ये २४,४९९ रुपये
Mi NoteBook Pro लॅपटॉ ४५, ९९९ रुपयांना
10000mAh ची Mi Power Bank 3i अवघ्या १,१९९ रुपयांना
Redmi Watch 2 Lite केवळ २,२२९ रुपयांना
फ्रीमध्येही प्रोडक्ट्स जिंकण्याची संधी
वरील प्रोडक्ट्सवर आणखी एक्सचेंज बोनस तुम्ही मिळवू शकता. याशिवाय कंपनीने काही खास अॅक्टिव्हिटी देखील ठेवल्या आहेत. यामध्ये ९९ रुपयांनाही काही गोष्टी खरेदी करण्याची संधी ग्राहकांना आहे. तसंच ग्राहक प्ले अँड विन गेम्समध्ये सामिल होऊ शकतात. यामध्ये कंपनीचे लेटेस्ट प्रोडक्ट्स जसंकी Xiaomi Trimmer 2C, Redmi Watch 2 Lite, Redmi Writing Pad फ्रीमध्ये जिंकण्याटी संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.