Xiaomi New Smartphone : Xiaomi चा पहिला फोल्डेबल फोन ‘मिक्स फ्लिप’ लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. या फोल्डेबल फोनची युरोपमध्ये ऑगस्टच्या मध्यापर्यंत लाँचिंग होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भारतात नेमका कधी हा लाँच होईल याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी, कंपनीच्या युरोपियन लाँचवरून अंदाज लावता येतो. या आधुनिक फोल्डेबल फोनची किंमत मात्र थोडी जास्त असण्याची शक्यता आहे.
क्लॅमशेल डिझाईन: हा भारतातील पहिला क्लॅमशेल डिझाईनमधील फोल्डेबल फोन असणार आहे.
स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेट: या फोनमध्ये सर्वात लेटेस्ट स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेट वापरण्यात आला आहे.
ड्युअल डिस्प्ले: यामध्ये दोन डिस्प्ले आहेत. आतील मोठा डिस्प्ले ६.८६ इंचचा आहे तर बाहेरील डिस्प्ले ४.०१ इंचचा आहे. दोन्ही डिस्प्ले AMOLED असून त्यांचा रिफ्रेश रेट १२० Hz इतका आहे.
कॅमेरा: यामध्ये लीकाच्या सहकार्याने तयार केलेले ड्युअल कॅमेरा आहेत. मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे.
बॅटरी: ४७८० mAh ची बॅटरी ६७W चार्जिंगला सपोर्ट करते.
युरोपमध्ये या फोनची किंमत २६०० लेव्ह ( Bulgarian currency) इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये हे सुमारे १,२०,८०० इतके होते. युरोपमध्ये देखील ही किंमत Samsung Galaxy Z Flip 6 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतात ही किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Xiaomi ने भारतात या फोल्डेबल फोनच्या लाँचबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण युरोपियन लाँचवरून भारतातही हा फोन लवकरच येईल असा अंदाज करता येतो. अधिकृत माहितीसाठी Xiaomi ची अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया पेज पाहात रहा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.