Xiaomi Smart Water Gun : श्याओमीने सादर केली 'स्मार्ट पिचकारी'.. भारतात कधी होणार लाँच? पाहा व्हिडिओ

Smart Water Gun : या पिचकारीचा टीझर अगदीच भन्नाट आहे. पॉवर रेंजर्स किंवा अव्हेंजर्सच्या हातात जशा अत्याधुनिक बंदूका असतात, तशाच प्रकारचा लुक या पिचकारीचा आहे.
Xiaomi Smart Water Gun
Xiaomi Smart Water GuneSakal

Xiaomi Water Gun : रंगांचा उत्सव असणारी होळी अन् रंगपंचमी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपले आहेत. या पार्श्वभूमीवर श्याओमीने एक खास 'स्मार्ट पिचकारी' सादर केली आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या पिचकारीचा व्हिडिओ सादर केला आहे. Mijia Pulse Water Gun असं या पिचकारीचं नाव आहे.

या पिचकारीचा टीझर अगदीच भन्नाट आहे. पॉवर रेंजर्स किंवा अव्हेंजर्सच्या हातात जशा अत्याधुनिक बंदूका असतात, तशाच प्रकारचा लुक या पिचकारीचा आहे. यामध्ये वॉटर शूटिंगसोबतच लायटिंग इफेक्टही दिला आहे. व्हिडिओमध्ये याला भरण्याची पद्धत आणि फायरिंग मोड्सही दाखवले आहेत. (Xiaomi Water Gun Features)

काय आहेत फीचर्स?

  • ही पिचकारी अवघ्या 10 ते 15 सेकंदांमध्ये पूर्ण भरते.

  • या पिचकारीमध्ये तीन फायरिंग मोड्स देण्यात आले आहेत.

  • नॉन स्टॉप सोकिंग, सिंगल टार्गेटिंग आणि पॉवरफुल बर्स्ट असे तीन मोड्स यात आहेत.

  • या वॉटर गनची रेंज तब्बल 7 ते 9 मीटर एवढी आहे.

  • एका सेकंदात यातून तब्बल 25 वॉटर शॉट्स फायर करता येतात.

Xiaomi Smart Water Gun
Ray-Ban Meta : टूर गाईडचं काम करणार मेटाचे स्मार्ट गॉगल्स; ऐतिहासिक अन् महत्त्वाची ठिकाणे ओळखून देणार माहिती.. पाहा व्हिडिओ

भारतात होणार लाँच?

सध्या ही वॉटर गन केवळ चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. मात्र होळीच्या पार्श्वभूमीवर याचा टीझर आल्यामुळे लवकरच ही भारतात देखील उपलब्ध केली जाईल अशी शक्यता आहे. कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. (Xiaomi water Gun Launch Date)

अमेझॉनवर उपलब्ध पर्याय

दरम्यान, श्याओमीची गन लाँच होण्यापूर्वी जर तुम्हाला स्मार्ट वॉटर गन खरेदी करायची असेल, तर अमेझॉनवर अगदी 300 रुपयांपासून चांगले पर्याय उपलब्ध आहेत. Nerf, VikriDA, Zest आणि इतर कित्येक कंपन्यांच्या स्मार्ट वॉटर गन्स याठिकाणी उपलब्ध आहेत. यामध्ये पिस्तुल आणि रायफल अशा दोन्ही पद्धतीच्या वॉटर गन्सचा समावेश आहे. (Water Gun on Amazon)

Xiaomi Smart Water Gun
Apollo Humanoid Robot : आता ह्युमॅनॉईड रोबोट बनवणार मर्सिडीजच्या गाड्या; कसा करतो काम? पाहा व्हिडिओ..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com