Apollo Humanoid Robot : आता ह्युमॅनॉईड रोबोट बनवणार मर्सिडीजच्या गाड्या; कसा करतो काम? पाहा व्हिडिओ..

Mercedes Factory Robot : यासाठी मर्सिडीजने अ‍ॅपट्रॉनिक या ह्यूमॅनॉईड रोबोट बनवणाऱ्या कंपनीसोबत करार केला आहे.
Apollo Humanoid Robot
Apollo Humanoid RoboteSakal

Mercedes-Benz partnered with Apptronik : लग्झरी कार म्हटलं की मर्सिडीज-बेंझ कंपनीचं नाव अग्रगण्य कंपन्यांमध्ये येतं. या कंपनीने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. ही कंपनी कारच्या उत्पादनासाठी आता चक्क ह्यूमॅनॉईड रोबोट्सची मदत घेणार आहे. आपल्या फॅक्टरीमदील कामगारांना मदत म्हणून हे रोबोट काम करतील असं कंपनीने म्हटलं आहे.

यासाठी मर्सिडीजने अ‍ॅपट्रॉनिक या ह्यूमॅनॉईड रोबोट बनवणाऱ्या कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी मर्सिडीजला 'अपोलो' नावाचे ह्यूमॅनॉईड रोबोट (Apollo Humanoid Robot) बनवून देणार आहे. मानवी मेहनत लागणारी कित्येक कामे यामुळे ऑटोमेटेड होणार आहेत, असं कंपनीने सांगितलं.

कार बनवण्यासाठी लागणारे अवजड सुटे पार्ट उचलून ते कामगारांपर्यंत आणून देणे, तसंच असेम्बल झालेले पार्ट्स पुन्हा दुसरीकडे नेऊन ठेवणे अशा कामांसाठी अपोलोचा वापर केला जाऊ शकतो. एवढंच नाही, तर कंपोनंट्सची चाचणी करण्यातही हा रोबोट तरबेज आहे.

Apollo Humanoid Robot
Tecno Robot Dog at MWC : टेक्नोने सादर केला चक्क रोबोट डॉग.. सोबतच लाँच केले स्मार्टफोन अन् 'गेमिंग एआर'; पाहा व्हिडिओ

कसा आहे अपोलो रोबोट?

अपोलो रोबोटची उंची 5 फूट 8 इंच एवढी आहे. त्याचं वजन 160 पाऊंड (72.5 किलो) एवढं आहे. हा रोबोट 55 पाउंड (25 किलो) पर्यंत वजन उचलू शकतो. तसंच ब्रेकची आवश्यकता असल्यास हा रोबोट स्वतःच स्वतःला चार्जिंगला लावू शकतो. कारखान्यांमध्ये मानवांसोबत काम करण्यासाठीच हा रोबोट डिझाईन तयार केला आहे. (Apollo Robot)

मर्सिडीजप्रमाणेच इतर कंपन्याही लवकरच आपला रोबोट कारखान्यांमध्ये वापरण्यास सुरू करतील असा विश्वास अपोलोचे सीईओ आणि सह-संस्थापक जेफ कार्डेनास यांनी व्यक्त केला.

रोबोट्सना देणार हमालीचं काम

"अधिकाधिक अ‍ॅडव्हान्स गाड्या बनवण्यासाठी आम्ही एआय आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाची मदत घेत आहोत. आमचे कुशल कामगार आणि सध्याचे अत्याधुनिक रोबोट हे एकत्र मिळून कसं काम करतील यासाठीच्या शक्यता आम्ही तपासून पाहत आहोत." अशी माहिती मर्सिडीज-बेंझ ग्रुपचे बोर्ड मेंबर जॉर्ग बर्झर यांनी दिली.

Apollo Humanoid Robot
Elon Musk Robot : इलॉन मस्कचा रोबोट घालतोय चक्क कपड्यांची घडी ! घरातल्या कामांमध्येही करू लागला मदत.. पाहा व्हिडिओ

"सध्या अधिक कौशल्याची गरज नसलेल्या, आणि जास्त करून हमालीच्या कामासाठी आम्ही रोबोटचा वापर करणार आहोत. यामुळे आमच्या कुशल कामगारांना आपला वेळ इतर महत्त्वाच्या कामांसाठी देता येईल." असंही बर्झर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com