Facebook किंवा Twitter च्या अकाउंटला व्हेरीफाईड ब्लु टिक हवीये? मग फॉलो करा या स्टेप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Facebook किंवा Twitter च्या अकाउंटला व्हेरीफाईड ब्लु टिक हवीये?

Facebook किंवा Twitter च्या अकाउंटला व्हेरीफाईड ब्लु टिक हवीये?

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : जगभरात कोट्यवधी लोक मेसेज पाठवण्यासाठी, एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी तसंच आपल्या आयुष्यातील काही क्षण शेअर करण्यासाठी फेसबुक (Facebook Login) आणि ट्विटरचा (Twitter login)वापर करतात. फेसबुक आपले हजारो मित्र असतात तर तेवढेच फॉलोअर्सही ट्विटरवर असतात. मात्र काही अकाउंट्स स्पेशल असतात. काही अकाउंट्स च्या नावासमोर एक स्पेशल निळ्या रंगाची टिक (Blue tick accounts) असते. ययांनाच आपण व्हेरीफाईड अकाउंट्स (Verified accounts) म्हणतो. साधारणतः सेलिब्रिटीज किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या अकाऊंटलाच ही ब्लु टिक मिळते. मात्र तुम्हालाही ब्लु टिक मिळवायची आहे का? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस. (know how to verify accounts of Facebook and Twitter)

हेही वाचा: WhatsApp वापरताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा...

Twitter वर तुमच्या अकाउंटला व्हेरिफाय टिक मिळवण्यासाठी तुम्हाला ट्विटरकडे निवेदन पाठवावं लागेल. यासाठी आता उन्हं ट्विटरनं निवेदन स्वीकारणं सुरु केलं आहे. मात्र फेसबुकवर ब्लु टिक मिळवण्याची पद्धत जरा वेगळी आहे. चला ईतर मग जाणून घेऊया.

फेसबुक व्हेरिफिकेशनसाठी -

 • फेसबुकवर अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला https://www.facebook.com/help/contact/342509036134712 या लिंकवर क्लिक करावं लागेल.

 • ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला योग्य ती माहिती टाईप करावी लागेल.

 • यानंतर तुम्हाला प्रोफाइल आणि पेज असे दोन ऑप्शन येतील.

 • जे व्हेरिफाय करायचं आहे ते ऑप्शन निवडा.

 • यानंतर ड्रॉपडाउन मेनूमध्ये तुमचा प्रोफेशन निवडा आणि देशही निवडा.

 • यानंतर तुम्हाला तुमच्या आयडी कार्डचा फोटो अपलोड करावा लागेल.

 • यानंतर तुम्हाला एकुणात व्हेरिफाय का करून घ्यायचंय? याचं कारण स्पष्ट करावं लागेल.

 • यानंतर तुम्हाला दुसऱ्या सोशल मीडियावरील तुमची प्रोफाइल लिंक द्यावी लागेल.

 • संपूर्ण प्रोसेस झाली की सबमिटवर क्लिक करा.

 • यानंतर तुम्हाला फेसबुककडून मेल येईल.

 • जर काही कारणास्तव तुमचं अकाउंट व्हेरिफाय झालं नाही तर चिंता करू नका. ३० दिवसांनंतर पुन्हा प्रयत्न करा.

हेही वाचा: खुशखबर! BSNL ग्राहकांना देणार १०० मिनिटं फ्री

ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी -

ट्विटरवर व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी सुरुवातीला ट्विटरकडे निवेदन द्यावं लागेल. यासाठी तुम्हाला सेटिंग्समध्ये व्हेरिफिकेशनचं ऑप्शन दिसेल. यानंतर ट्विटरकडून तुमच्या अकाउंटला रिव्ह्यू करण्यात येईल. तुमचं अकाउंट गाईडलाईन्सनुसार बरोबर असेल तरच तुम्हाला ब्लु टिक मिळेल.

(know how to verify accounts of Facebook and Twitter)

loading image
go to top