esakal | Yamaha नंतर Hero MotoCorp ने वाढवला वॉरंटी अन् फ्री सर्विस कालावधी
sakal

बोलून बातमी शोधा

Hero MotoCorp

अनेक कार कंपन्यांनी नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी त्यांच्या कारवर आकर्षक ऑफर देण्यास सुरूवात केली आहे, तर काही कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांच्या वहानांवर वॉरंटी व फ्री सर्विस देणे सुरु केले आहे.

Yamaha नंतर Hero MotoCorp ने वाढवला वॉरंटी अन् फ्री सर्विस कालावधी

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

कोरोनाच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेमुळे बऱ्याच राज्यात लॉकडाउन (Lockdown) आणि कर्फ्यू लावण्यात आले आहेत. परंतु या लॉकडाऊनमुळे देशातील प्रत्येक उद्योग क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे, तसेच भारताच्या वाहन उद्योगास देखील मंदीचा सामना करावा लागत आहे, ज्यात अनेक कार कंपन्यांनी नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी त्यांच्या कारवर आकर्षक ऑफर देण्यास सुरूवात केली आहे, तर काही कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांच्या वहानांवर वॉरंटी व फ्री सर्विस देणे सुरु केले आहे. यामध्ये टाटा, मारुती यांच्यासह महिंद्रा, टोयोटा आणि ह्युंदाई या कंपन्यांचा समावेश आहे. (yamaha hero motocorp extended free service and warranty period on bikes and scooters)

या कार कंपन्यांनंतर देशातील टू व्हिलर कंपन्यांनी आपल्या सध्याच्या ग्राहकांच्या सोयीसाठी त्यांची वॉरंटी आणि फ्री सर्विस वाढविणे सुरू केले आहे. सर्व प्रथम देशातील आघाडीच्या टू व्हिलर उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) याची घोषणा केली. कोरोनामुळे देशातील विविध राज्यांत लावण्यात आलेले लॉकडाऊन कालावधीत त्यांच्या ग्राहकांना चांगली सुविधा पुरवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यात कंपनीने आपल्या बाईक व स्कूटरची वॉरंटी आणि फ्री सर्विस ही 60 दिवसांसाठी म्हणजे दोन महिन्यांसाठी वाढविली आहे.

हेही वाचा: अटी मान्य न केल्यास whatsapp होणार डिलीट

कंपनीच्या म्हणण्यानुसर लॉकडाऊन दरम्यान संपत आलेल्या फ्री सर्विसची पूर्तता करण्यासाठी ग्राहक लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडू शकतात, त्यामुळे ग्राहकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी फ्री सर्विसची कालावधी 60 दिवसांसाठी वाढविण्यात येत आहे.या स्वदेशी टू-व्हीलर उत्पादक कंपनीने आपल्या ग्राहकांना फ्री सर्विस आणि वॉरंटीचा कालावधी केवळ 60 दिवसांसाठीच वाढविला नाही, तर हिरो मोटोकॉर्प कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (CSR) अंतर्गत गुरुग्राम प्रशासनासह मिळून 100 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे.

हिरो मोटोकॉर्प अगोदर यामाहा या कंपनीने आपल्या ग्राहकांची सुविधा लक्षात घेऊन सर्व बाईकवर वॉरंटी व फ्री सर्विसचा कालावधी 60 दिवस किंवा दोन महिने वाढविला आहे, आता यामाहाच्या ग्राहकांच्या बाईकची संपत आलेली वॉरंटी फ्री सर्विस 30 जून 2021 पर्यंत क्लेम करु शकतात.

(yamaha hero motocorp extended free service and warranty period on bikes and scooters)

हेही वाचा: Google Maps पुढील काळात आणणार 'हे; महत्वाचे फीचर्स; जाणून घ्या