
Yamaha MT-09 Bike Launch in India : भारतीय मोटरसायकल मार्केटमध्ये 2025 या वर्षात Yamaha MT-09 आपले दमदार पुनरागमन करणार आहे. Yamaha India कंपनीने या मोटरसायकलची किंमत आणि बुकिंगसाठीची प्रक्रिया जून किंवा जुलैमध्ये जाहीर करण्याची तयारी चालवली आहे. Yamaha MT-09 ही प्रीमियम बाइक निवडक डीलरशिपमधून विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे. मोठ्या बाइक्ससाठी लागणाऱ्या डिलिव्हरी व विक्री नंतरच्या सेवेसाठी ही पद्धत अवलंबली जाईल. बुकिंग नंतर किमान दोन महिने वाट पाहावी लागेल, अशी शक्यता आहे.
Yamaha ने सुरुवातीला 2000च्या दशकात YZF-R1 भारतात आयात करून मोठ्या बाइक्सच्या क्षेत्रात पाय ठेवला होता. मात्र, काही काळापासून या विभागात कंपनीची उपस्थिती दिसून आली नव्हती. आता MT-09 च्या माध्यमातून Yamaha पुन्हा एकदा भारतीय प्रीमियम बाइक बाजारपेठेत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे.
Yamaha MT-09 ही एक स्ट्रीट-नेकेड मोटरसायकल असून तिच्या डिझाइनची आणि परफॉर्मन्सची विशेष दखल घेतली जात आहे. 890cc च्या इनलाइन-ट्रिपल CP3 इंजिनमुळे ही बाइक 117 bhp पॉवर आणि 93 Nm टॉर्क निर्माण करते. या मोटरसायकलमध्ये सहा गिअरचा मॅन्युअल गिअरबॉक्स व Y-AMT युनिटचा समावेश आहे.
रोबोटसारखे हेडलाईट काउल, मोठा फ्युल टँक, स्लीक टेल सेक्शन यामुळे ही बाइक स्ट्रीट-नेकेड सेगमेंटमध्ये उभी राहते. विशेषतः SP व्हर्जन डिझाइनमध्ये अधिकच आकर्षक दिसते.
Yamaha MT-09 मध्ये स्लाइड कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, ड्युअल-चॅनेल ABS आणि तीन वेगवेगळे राइडिंग मोड्स स्ट्रीट, रेन आणि स्पोर्ट देण्यात आले आहेत. याशिवाय दोन कस्टमायझेबल मोड्सचा देखील समावेश आहे, ज्यामुळे रायडरला स्वतःच्या स्टाईलप्रमाणे बाइक चालवण्याचा अनुभव मिळतो.
भारतीय बाजारपेठेत MT-09 च्या आगमनाने Triumph Street Triple R आणि RS तसेच Kawasaki Z900 यांसारख्या प्रीमियम मोटरसायकल्सना आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
Yamaha MT-09 च्या आगमनाने भारतीय प्रीमियम बाइकप्रेमींसाठी एक नवीन पर्व सुरू होईल. आधुनिक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि दमदार परफॉर्मन्समुळे MT-09 ही बाइक निश्चितच भारतीय बाजारपेठेत आपले वेगळे स्थान बनवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.