

Yamaha RayZR 125 New Model: Colours, TFT Display and Smart Features Explained
sakal
यामाहानं (Yamaha) भारतात आपल्या RayZR 125 Fi Hybrid स्कूटर श्रेणीमध्ये 2026 साठी महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नवीन रंग पर्याय, आकर्षक ग्राफिक्स आणि अतिरिक्त वैशिष्ट्यांमुळं ही स्कूटर आता अधिकच आकर्षक दिसत आहे. तिची 'स्पोर्टी' डिझाइन तशीच कायम असली, तरी नवीन पेंट फिनिश आणि अद्ययावत ग्राफिक्समुळं तिला एक नवीन लूक मिळाला आहे. तरुणांना आकर्षित करणारा स्टायलिश लूक देण्याचा कंपनीचा उद्देश आहे, जेणेकरून दैनंदिन प्रवासात ही स्कूटर वेगळी आणि उठून दिसेल.