योगासनांमुळे गॅझेट्‌सच्या आकलनात वाढ

वृत्तसंस्था
शनिवार, 24 डिसेंबर 2016

योगासने व ध्यानामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होतात, हे सर्वांनाच माहीत आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगातही योगासनांचा चांगला फायदा होत असल्याचे नुकतेच

योगासने व ध्यानामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होतात, हे सर्वांनाच माहीत आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगातही योगासनांचा चांगला फायदा होत असल्याचे नुकतेच
एका संशोधनातून दिसले. मिनिसोटा विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनानुसार, योगासने व ध्यानधारणा करणाऱ्या व्यक्तींचा मेंदू सर्व गॅजेट्‌स अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतो. हे संशोधन"टेक्‍नॉलॉजी' या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. दीर्घकाळ योगासने करणाऱ्या व्यक्तींचा मेंदू संगणकाप्रमाणे वेगाने काम करतो. या सर्वेक्षणामध्ये 36 लोकांचा सहभाग होता. एका गटातील बारा जणांना वर्षभर आठवड्यातून किमान दोनदा एक तास योगासने करण्यास सांगितली गेली. दुसऱ्या गटातील 24 आरोग्यसंपन्न व्यक्तींना ध्यान किंवा योगासने करायची परवानगी दिली नाही. या नंतर दोन्ही गटांना संगणकातील नवीन प्रणाली वापरण्यास दिली. ते पुढील चार आठवडे दररोज दोन तास संगणकावर काम करत होते. योगासने

करणाऱ्या गटातील लोकांनी ही नवी प्रणाली लवकर आत्मसात केली. या उलट योगासने न करणाऱ्या गटाला ती लवकर आत्मसात करता आली नाही. मुख्य संशोधक बीन म्हणाले,""आम्ही गेल्या काही वर्षांत संगणक आणि मेंदू यांच्यातील संबंधांकडे लक्ष वेधले आहे. या संशोधनात मेंदूवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढील काही वर्षांत संगणक व मेंदूच्या संवादातील अडथळा दूर होऊ शकतो.''
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yoga growth of roots perpetrated gadgets