युट्युबचे नवीन म्युझिक फिचर तीन महिने देणार फ्री सबस्क्रिप्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 मार्च 2019

तुमचे युट्युब फक्त अपडेट करावे लागेल. त्यानंतर 'ही' सुविधा तुम्हाला मिळणार आहे. पहिले तीन महिने याचा मोफत लाभ घेता येणार आहे.

युट्युबने भारतात नुकताच Youtube Music, Youtube Music Premium आणि Youtube Premium लाँच केले आहे. विशेष म्हणजे यूट्यूब प्रीमियमससाठी कोणतेही नवीन अॅप डाऊनलोड करायची गरज नाही.

या लाँचनंतर भारतामध्ये स्ट्रिमिंग स्पेसमध्ये आणखी एक मोठं नाव जोडलं गेलं आहे. Youtube Music म्हणजे गाण्यांचा खजाना आहे. सर्व गाणी एकाच ठिकाणी उपबलब्ध असणार आहेत. मुळ गाण्यासोबत रीमिक्स, लाइव परफॉर्मेंसचे कव्हरेज, कव्हर साँग आणि म्युझिक व्हिडियोही असणार आहे.

युट्युबवर तुम्हाला कॅटलॉग मिळेल. त्यामध्ये कंपनी दोन प्रकारची सर्व्हिस देत आहे. यामध्ये एक फ्री Youtube Music आणि दुसरे Youtube Music Premium आहे. गतवर्षी जूनमध्ये अमेरिकेसह 17 देशात युट्युबने ही सर्व्हिस सुरू केली होती.

Youtube Music चा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? -
तुमचे युट्युब फक्त अपडेट करावे लागेल. त्यानंतर ही सुविधा तुम्हाला मिळणार आहे. पहिले तीन महिने याचा मोफत लाभ घेता येणार आहे. त्यानंतर मात्र, प्रति महिना 99 रूपये देऊन सबस्क्रिप्शन करावे लागेल. भारतात असलेल्या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सला Youtube Music चांगलीच टक्कर देईल. गुगलनेही आपल्या होमपेज Youtube Music बद्दल माहिती दिली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: you tube launches music streaming services in india Three months free sevice 

टॅग्स