जगभरात काही तासांसाठी YouTube सेवा विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

you tube service on track

यू-ट्यूबची विस्कळीत झालेली सेवा आता पुर्वपदावर आल्याची माहिती यूट्यूबने ट्विट करुन दिली आहे.

जगभरात काही तासांसाठी YouTube सेवा विस्कळीत

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: यूट्यूब युजर्संसाठी आजच्या दिवसातील काही तास हिरमोड करणारे ठरले आहेत. कारण काही तासांपुर्वी यूट्यूबवरील व्हिडिओ डाऊनलोड करण्यास अडचणी येत होत्या. तसेच इतर सेवांवरही परिणाम झाल्याचे दिसले होते. यासंबंधीची माहिती स्वतः यूट्यूबने दिली होती. काही वेळांपुर्वी युजर्संना यूट्यूबचे व्हिडिओ डाऊनलोड करण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. 

पण आता या अडचणीवर यूट्यूबने मात केली आहे. याबद्दलचे ट्विटही यूट्यूबने केले आहे, ' ... आणि आम्ही आता परत आलोय. ज्या अडचणी युजर्सला आल्या त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. यूट्यूबमध्ये येत असणाऱ्या अडचणी निकाली निघाल्या आहेत. सर्व युजर्संनी संयम दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.' आज पहाटेपासूनच बऱ्याच युजर्संना या अडचणी येत होत्या, पण त्यावर तोडगा निघाल्याची माहिती यूट्यूबने दिली आहे. 

तत्पुर्वी, युट्यूबने स्वतः ट्विट करुन माहिती दिली होती की, 'जर तुम्हाला यूट्यूबवरील व्हिडीओ पाहण्यास अडचणी येत असतील तर, तुम्ही एकटेच नाही आहात. आमची टिम यावर काम करत आहे. लवकरच ही अडचण आम्ही दूर करू. इथं तुम्हाला आम्ही अपडेट देत राहू.'

यापुर्वी युजर्संना यूट्यूबवरील व्हिडिओ पाहण्यास, तो डाऊनलोड करण्यास अडचणी येत होत्या. याबद्दलच्या तक्रारी बऱ्याच युजर्संनी ट्विट करून दिल्या होत्या. 

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top