सावधान! Google वर सर्च करु नका 'या' 4 गोष्टी, नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google

सावधान! Google वर सर्च करु नका 'या' 4 गोष्टी, नाहीतर...

आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल दिसतो, मग त्याचे वय कितीही असो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा त्यात समावेश असतो. गुगल जवळजवळ प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देते, त्यामुळे वापरकर्त्यांना हवे ते सर्च करणे आवडते.

पण तुम्हाला माहीत आहे का की गुगलवर या गोष्टी सर्च केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. होय, आता तुम्ही विचार करत असाल की हे कसे होऊ शकते. गुगलने युजर्सना काही गोष्टी सर्च करण्यावर बंदी घातली आहे. या विषयांचा शोध घेतल्यास तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल.

बॉम्ब कसा बनवला जातो?

अनेकवेळा लोक गंमत म्हणून अशा गोष्टींचा शोध घेतात, ज्याची त्यांना माहितीही नसते, पण पोलिस त्यांच्यावर कारवाई करू शकतात. त्यामधून बॉम्ब कसा बनवायचा याचा शोध घेणे खरं तर Indian security agencies गुगल सर्च अॅक्टिव्हिटीवर सतत लक्ष ठेवतात. अशा परिस्थितीत तुम्ही हा किंवा असा कोणताही विषय सर्च केला तर तुम्हीही संशयाच्या भोवऱ्यात येऊ शकता आणि कारवाई होऊ शकते.

मनोरंजनासाठी चाइल्ड क्राइम फोटो किंवा व्हिडिओ सर्च करणे

अनेकदा लहान मुलाचा फोटो हा संवेदनशील कंटेंट मानला जातो, अशा परिस्थितीत जर तुम्ही चाइल्ड क्राइम कंटेंट किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही माहिती केवळ मनोरंजनासाठी सर्च केली तर तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.

फिमेल क्राईम महिला कंटेंट

जर तुम्ही मनोरंजनासाठी असा कंटेंट सर्च करत असाल, तर ही चूक करू नका. तुम्हाला पोलिसांच्या तपासालाही सामोरे जावे लागू शकते.

शस्त्रास्त्रांची माहिती मिळवणे

अनेकांना छंदामुळे किंवा प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रस असतो, ते शस्त्रास्त्रांबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात आणि दररोज शस्त्रास्त्रांबद्दल सर्च करत असतात, परंतु त्यांच्या कृतीमुळे ते अडचणीत येऊ शकतात.

टॅग्स :TechnologyGoogle