हे कोड टाकताच तुमचा Android सर्व काही सांगू लागेल; जाणून घ्या

Android Secret Code: स्मार्टफोनसाठी (Smartphone) असे सिक्रेट कोड आहेत जे तुमच्या फोनमधील लपलेली माहिती चुटकीसरशी उघड करू शकतात.
Android Secret Codes
Android Secret CodesSakal

अँड्रॉइडमधील गुप्त कोड्स (Android Secret Codes):

काही वर्षांपूर्वी आमच्या सिममधील शिल्लक (Balance) जाणून घेण्यासाठी आम्हाला * किंवा # ने सुरू होणारा कोड डायल करावा लागत होता. कालांतराने त्याचा वापर संपुष्टात आला. पण तुम्हाला माहीत आहे का की अजूनही अनेक सिक्रेट कोड (Android Secret Codes) आहेत जे तुमच्या फोनमधील लपलेली माहिती चुटकीसरशी उघड करू शकतात. हे अँड्रॉइडमधील गुप्त कोड्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, विशेषत: जेव्हा तुम्ही चुकून तुमच्या डिव्हाइसवर सिस्टम लॉक इंस्टॉल केले असेल किंवा मोबाईल हरवला असेल.

Android Secret Codes
Amazon Sale: 25000 पेक्षा कमी किंमतीचे बेस्ट 5G स्मार्टफोन

हे Android गुप्त कोड वापरण्यास अतिशय सोपे आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या डायलर स्क्रीनवर जाऊन कोड टाकायचा आहे. हे अगदी फोन नंबर डायल करण्यासारखे आहे. कोड डायल करण्यासाठी फक्त कॉल बटण दाबा. हा कोड तुम्हाला तुमच्या डिव्हाइसच्या IMEI नंबरपासून ते फोन दुरुस्त करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या लपलेल्या मेनूपर्यंत बरीच माहिती सांगतात. हे कोड साधारणपणे सर्व Android स्मार्टफोनवर काम करतात. तथापि काही कोड केवळ मर्यादित उपकरणांसाठी आहेत.

Android Secret Codes
मोबाईल स्क्रीन अशी ठेवा सुरक्षित; जाणून घ्या टिप्स

काही खास अँड्रॉइड गुप्त कोड (Android secret codes)-

*#06# - हा कोड तुमच्या डिव्हाइसचा IMEI नंबर दाखवेल

*#*#225#*#* - हा कोड तुमच्या डिव्हाइसची कॅलेंडर स्टोरेज माहिती दाखवतो

*#*#426#*#* - हा कोड Google Play सेवा माहिती दाखवतो

*#*#1234#*#* - तुमच्या डिव्हाइसची PDA सॉफ्टवेअर आवृत्ती दाखवते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com