
YouTube Premium Lite launched in India its benefits
esakal
YT Premium Lite : भारतातील यूट्यूब प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. यूट्यूबने भारतात त्यांचा नवीन YouTube Premium Lite प्लॅन लाँच केला आहे, ज्याची किंमत आहे फक्त 89 रुपये प्रति महिना. या परवडणाऱ्या योजनेसह आता तुम्ही तुमच्या आवडत्या व्हिडिओंचा आनंद कोणत्याही जाहिरातींच्या व्यत्ययाशिवाय घेऊ शकता. हा प्लॅन स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही यासारख्या सर्व डिव्हाइसवर उपलब्ध आहे ज्यामुळे तुम्हाला कधीही, कुठेही मनोरंजनाचा आनंद घेता येईल.