YouTube Setting: यूट्यूबवर 'ही' सेटिंग केल्यास दिसणार नाहीत अडल्ट व्हिडिओ अन् रिल

YouTube Setting: लहान मुलांनासोबत बिनधास्त यूट्यूबवर व्हिडिओ पाहू शकणार. कारण यूट्यूबवरची ही सेटिंग केल्यास अश्लील व्हिडिओ आणि रिल दिसणार नाहीत.
YouTube Setting
YouTube SettingSakal

YouTube Setting: सध्या लाखो लोक युट्युबचा वापर करतात. युट्युबवर व्हिडिओ मोफत पाहायला मिळतात. युट्युबवर अनेक व्हिडिओ मोफत पाहायला मिळतात. युट्युबवर तुम्ही तुमच्या मूडनुसार संगीत, चित्रपट आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. पण अनेक वेळा हे प्लॅटफॉर्म तुम्ही केलेल्या सर्चनुसार तुम्हाला व्हिडिओ सुचवते. तुमच्या युट्युबवर एखादा अडल्ट व्हिडिओ येत असेल तर तुम्ही तो पुढील सेटिंग करून थांबवू शकता. यासाठी यूट्यूब सेटिंग्जमध्ये जाऊन काही बदल करावे लागतील.

YouTube वर Restricted Mode कसा चालू किंवा बंद करावा

Restricted Mode ही एक पर्यायी सेटिंग आहे जी तुम्ही YouTube वर वापरू शकता. हे फिचर तुम्ही किंवा तुमच्या डिव्हाइसचा वापर करणाऱ्या इतरांना पाहण्यास सक्षम नसलेले अडल्ट व्हिडिओ तपासण्यात मदत करू शकते. लायब्ररी, विद्यापीठे आणि इतर सार्वजनिक संस्थांमधील संगणकांवर नेटवर्क प्रशासकाद्वारे प्रतिबंधित Restricted Mode सुरू केलेला असतो. तुम्हाला जर असे वाटत असेल की मुलांनी अडल्ट व्हिडिओ पाहू नये तर मोबाइलमध्ये Restricted Mode सुरू करू शकता.

YouTube Setting
Mobile Care Tips in Monsoon: पावसात मोबाईल भिजल्यास लगेच करा 'या' गोष्टी, फोन होणार नाही खराब

अशी करा सेटिंग्ज

सर्वात आधी युट्यूब ॲप ओपन करावे.

त्यानंतर प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करावे.

यानंतर तुम्हाला सेटिंगवर क्लिक करावे लागेल.

तुम्हाला जनरल सेटिंगमध्ये जावे लागेल.

तुम्हाला Restricted Mode चा पर्याय दिसेल. तो ऑन करावा.

ते चालू केल्यानंतर तुम्ही लहान मुले किंवा कुटुंबातील सदस्यांसमोरही आरामात व्हिडिओ पाहू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com