YouTube Expands Shopping Affiliate Program in India with Amazon, Meesho & Ajio
esakal
YouTube Shopping Affiliate Expansion: येत्या सण-उत्सवांच्या काळात भारतीय ऑनलाईन बाजारात मोठा धमाका करण्यासाठी YouTube ने आपली कंबर कसली आहे. कंपनीने आपल्या 'YouTube Shopping Affiliate Program' चा विस्तार करत देशातील प्रमुख ई-कॉमर्स दिग्गजांना एकाच छताखाली आणले आहे. या नव्या करारांतर्गत आता Amazon, Meesho, Ajio, Tata CLiQ आणि Snapdeal यांसारखे मोठे मर्चेंट पार्टनर्स YouTube च्या डिजिटल शेल्फवर उपलब्ध झाले आहेत.
यापूर्वी या प्रोग्राममध्ये Flipkart, Myntra, Shopsy, Nykaa, Purplle आणि Tira यांसारखे प्लॅटफॉर्म्स समाविष्ट होते. आता नवीन कंपन्यांच्या प्रवेशामुळे YouTube क्रिएटर्ससाठी कमाईचे आणि प्रॉडक्ट्स रेकमेंड करण्याचे पर्याय प्रचंड पटीने वाढले आहेत.