
Zoho Arattai App
esakal
Arattai App : भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी झोहोने आपले नवीन मेसेजिंग अॅप ‘Arattai’ सादर केले आहे. कमी इंटरनेट आणि स्वस्त स्मार्टफोनवरही सुरळीत काम करण्याच्या दाव्यासह हे अॅप बाजारात उतरले आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात जिथे ग्रामीण आणि दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी मर्यादित आहे, Arattai एक आकर्षक पर्याय ठरू शकते. पण व्हॉट्सअॅपच्या प्रचंड लोकप्रियतेला हे अॅप आव्हान देऊ शकेल का? हा मोठा प्रश्न आहे