esakal | संगणक, लॅपटॉपच्या मागणीत वाढ; किमतीही चांगल्याच वधारल्या!
sakal

बोलून बातमी शोधा

laptop computor

संगणक, लॅपटॉपच्या मागणीत वाढ; किमतीही वधारल्या

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : कोरोनामुळे (Corona virus) नागरिकांचे वर्क फ्रॉम होम (Work from home) काम करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे संगणक, लॅपटॉपच्या मागणीत नाशिकमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. परंतु, मागणीत वाढ होत असताना इंधन दरवाढीमुळे ट्रान्स्पोर्ट व्यवसाय महागल्याने संगणक, लॅपटॉपच्या किमतीत साधारण पाच हजार रुपये वाढ झाली आहे. (increase-in-demand-for-computers-laptops-nashik-marathi-news)

गेल्या लॉकडाउनचे नुकसान भरून निघाले

लॉकडाउनमध्ये (Lockdown) शाळा, दुकाने, बाजार, एकूणच बाहेर जाणे बंदच झाले. यामुळे प्रामुख्याने वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षणामुळे (Online education) गेल्या वर्षापासून मागणीत सातत्याने वाढ नोंदविली गेली आहे. कोरोना दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथिलतेनंतर २५ टक्के वाढ नोंदवली गेली असली तरी त्यात लॅपटॉप घेण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण घरूनच सुरू असल्यामुळे एका पॉवरफुल लॅपटॉपची गरज असते. ३० ते ५० हजार रुपयांच्या रेंजमध्ये लॅपटॉपचे अनेक पर्याय आहेत. त्यात मागणी वाढ नोंदवले गेल्यामुळे लॉकडाउनमधील नुकसान भरून निघाले आहे.

हेही वाचा: टेक्नोहंट : तुमचा लॅपटॉप ओव्हरहिट होतोय?

मागणीसोबत भावातही होतेय वाढ

‘वर्क फ्रॉम होम’ आणि ऑनलाइन शाळांमुळे टॅबच्या मागणीत वाढ नोंदविण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसह, वर्क फ्रॉम होममुळे तरुणाई घरी असूनही ‘गेमिंग लॅपटॉप, संगणकात वाढ झाली नाही, हे विशेष. कोरोनाकाळात डिजिटल वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. खासगी क्लासेस, शाळा, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे अशा अनेक गोष्टी डिजिटल होत असल्यामुळे लॅपटॉप संगणकाच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहे, याचा फटका इलेक्ट्रॉनिक मार्केटला बसला आहे. ट्रान्स्पोर्ट करणे महाग झाल्यामुळे लॅपटॉप-संगणकाच्या किमतीत साधारण पाच हजार वाढ झाली आहे.

''वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षणामुळे संगणक, लॅपटॉपच्या मागणीत वाढ झाली असून, त्यात लॅपटॉपला मागणी जास्त आहे. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे लॅपटॉप- संगणकाच्या किमतीत चार-पाच हजार वाढल्या आहेत.'' - संदीप चोकुरे, व्यावसायिक

(increase-in-demand-for-computers-laptops-nashik-marathi-news)

हेही वाचा: World Emoji Day: सर्वांत पहिला इमोजी कोणी तयार केला माहितीये का?

loading image