केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १४२वी रँक मिळवणारी आदिबा अनम
Study Room
Success Story : डॉक्टर होण्याचं स्वप्न पैशाअभावी भंगलं पण प्रयत्नांती ती झाली आयएएस ! रिक्षाचालकाच्या लेकीची यथोगाथा!
Adiba Anam IAS : रिक्षाचालक पित्याची मुलगी असलेल्या अदिबा अनम हिने मेडिकलचा खर्च झेपणार नाही म्हणून तो अभ्यासक्रम सोडला. मात्र यूपीएससीसाठी प्रचंड कष्ट करून तिने आयएएस होण्याचा मान मिळवलाच.
यूपीएससी म्हटलं की डोळ्यासमोर येतात मोठे क्लासेस, त्यांच्या फीज, त्यातून बाहेर पडणारे विद्यार्थी. पण आदिबा अनम या मुलीकडे यातलं काहीच नव्हतं. वडील रिक्षाचालक, घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम अशा परिस्थितीत अदिबाने अत्यंत कष्ट केले अभ्यास केला आणि आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत, १४२वी रँक मिळवली.