
Floods, Fires, and Failures — The Real Lessons from India’s 2025 Disasters
E sakal
From Reaction to Prevention: How India Can Build a Disaster-Resilient Future
लेखक : महेश शिंदे
या वर्षी भारत पुन्हा एकदा नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या फेऱ्यात अडकला. पंजाबमध्ये मुसळधार पावसाने नद्यांनी पातळी ओलांडली. हजारो गावं आणि लाखो एकर शेती पाण्याखाली गेली. उत्तराखंडच्या डोंगराळ भागात अचानक आलेल्या पुरात संपूर्ण वसाहती वाहून गेल्या. पश्चिम बंगालमध्ये दरडी कोसळून अनेकांचे प्राण गेले. गुजरातमधील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने २१ लोक जागीच मृत्युमुखी पडले, तर तेलंगणातील रासायनिक कारखान्यातील दुर्घटनेत जवळपास ५० जणांचा बळी गेला. शहरातही परिस्थिती वेगळी नव्हती पुण्याजवळील कुंडमळा पूल कोसळून निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आणि प्रयाग कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत भक्तांचा जीव गेला. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यात पूर आला.
ही सगळी उदाहरणं स्वतंत्र घटना नसून भारतातील आपत्ती व्यवस्थेतील मुलभूत दोषांची लक्षणं आहेत. आपल्याकडे आपत्तीनंतर मदत देण्याची क्षमता वाढली आहे, पण आपत्ती होण्याआधी ती टाळण्याची यंत्रणा अजूनही कमकुवतच आहे. आपण संकटाला प्रतिसाद देण्यात तरबेज झालो आहोत, पण संकट टाळण्यात मात्र अपयशी ठरलो आहोत.