

Balancing Student Safety and Public Order
esakal
लेखक : अभिजित मोदे
आपण एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात. जिल्ह्यातील एका ग्रामीण शासकीय शाळेची अवस्था गेल्या काही वर्षांपासून अत्यंत खराब आहे. शाळेच्या इमारतीला तडे गेले आहेत, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची अपुरी व्यवस्था आहे आणि मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वच्छतागृह उपलब्ध नाही. काही शिक्षकांची पदेही रिक्त आहेत.
विद्यार्थी व पालकांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, मात्र ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केले आहे. काही विद्यार्थ्यांनी मुख्य रस्ता अडवल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. स्थानिक राजकीय नेतेही आंदोलनात सहभागी झाले असून प्रशासनावर टीका करत आहेत.
वरिष्ठ अधिकारी आपल्याला आंदोलन तातडीने थांबवून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश देतात.
प्रश्न
१. या परिस्थितीत जिल्हाधिकारी म्हणून आपल्यासमोरील प्रमुख नैतिक व प्रशासकीय मुद्दे कोणते आहेत?
२. आपण जिल्हाधिकारी म्हणून परिस्थिती सोडविण्यासाठी कोणती तात्काळ, अल्पकालीन व दीर्घकालीन पावले उचलाल?
३. विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याऐवजी संवादाचा मार्ग का स्वीकाराल?
४. या प्रकरणात कोणती नैतिक मूल्ये व प्रशासकीय गुण आवश्यक आहेत?
उत्तर