Elon Musk neocloud
Esakal
Elon Musk warned that more than 200 neocloud companies face guppy-level death and consolidation
काहीच दिवसांपुर्वी टेस्ला आणि SpaceX चे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी एक पोस्ट केली. तसे ते सतत काही ना काही पोस्ट करत खळबळ उडवून देत असतातच. तशीच त्यांनी आता नव्याने केलेली पोस्ट सुद्धा चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी AI कंपन्यांना संगणकीय क्षमता पुरवणाऱ्या २०० हून अधिक ‘निओक्लाउड’ कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर विलीनीकरण किंवा व्यवसाय बंद करण्याच्या परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं असल्याचं म्हंटलं आहे. जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रचंड क्षमता असणारा व्यक्ती जेव्हा २०० हून अधिक कंपन्यांविषयी असं विधान करतो तेव्हा त्यांचं हे विधान पडताळून पहाणं आवश्यक ठरतं. नेमकं इलॉन मस्क यांनी नेमकं काय म्हटलंय, त्यात खरंच तथ्य आहे का, याविषयी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अहवाल काय म्हणतात आणि त्यांचं म्हणणं जर खरं असेल तर भविष्यात याचे काय परिणाम पहायला मिळू शकतात हे सगळं सविस्तर जाणून घेऊया या विशेष लेखाच्या माध्यमातून..