
भावनिक बुद्धिमत्ता
E sakal
How Emotional Intelligence Transforms Public Administration
लेखक : अभिजीत मोदे
यूपीएससी, एमपीएससी या परीक्षांची तयारी जरी करत असाल तरी कायम काही विद्यार्थी होऊन राहायचे नसते. अधिकारी म्हणून काम करताना इतर बुद्धिमत्ता आणि कौशल्यांसोबत भावनिक बुद्धिमत्तेची गरजही असतेच.त्यामुळेच तणावमुक्त राहून काम करण्यासाठी आणि खरा विकास घडवण्यासाठी त्याचाही अभ्यास, विचार हवाच.
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्याची, समजण्याची, त्यांचा योग्य वापर करण्याची आणि नियंत्रण ठेवण्याची क्षमता होय. ही केवळ बुद्धी नाही, तर भावना आणि तंत्रच आहे ज्यामुळे माणूस स्वतःच्या व सामाजिक जीवनात यशस्वी होतो.
'Emotion' या इंग्रजी शब्दाचा मूळ लॅटिन शब्द 'Emover' म्हणजे हलविणे किंवा ढवळणे आहे. भावनिक बुद्धिमत्तेचा विकास मानवी जीवनाच्या सुरुवातीपासून होतो आणि प्रत्येक टप्प्यावर यात सुधारणा होते.