

Epstein Files: Power, Secrecy and Their Global Consequences
E sakal
The Epstein Case and Its Impact on Global Politics and Accountability
लेखक - सचिन शिंदे
प्रस्तावना
अमेरिकेच्या न्याय खात्याने (US Department of Justice) आणि फेडरल न्यायालयांनी अलीकडे Epstein files चा पुढचा टप्पा जाहीर करताना काही चौकशीसंबंधी कागदपत्रे गुप्ततेतून मुक्त केली आणि काही नागरी खटल्यांतील (civil cases) नोंदी सीलबंद अवस्थेतून उघड केल्या.
त्यामुळे एप्स्टीन प्रकरण पुन्हा एकदा जागतिक माध्यमे आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. पूर्ण पारदर्शकतेची आश्वासने आणि प्रत्यक्षात मात्र मोठ्या प्रमाणावर ‘ब्लॅक केलेली’ (redacted) कागदपत्रे असा विरोधाभास पाहून जनतेत संशय, अविश्वास आणि कटकारस्थानांच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळत आहे.