Studyroom|Euclid Space Telescope : युक्लिड दुर्बिणीच्या माध्यमातून टिपलेली ९० कोटी आकाशगंगांची माहिती प्रसिद्ध

Dark Energy : युरोपियन स्पेस एजन्सीच्या युक्लिड दुर्बिणीने नवा डेटा प्रसिद्ध केला. यातून आकाशगंगा, डार्क मॅटर, डार्क एनर्जी आणि विश्वाच्या रचनेचा अभ्यास होणार अधिक व्यापक
Euclid Space Telescope

Euclid Space Telescope

Esakal

Updated on: 

लेखिका - श्रद्धा कोळेकर

विश्वाची रचना नेमकी कशी आहे? त्याचा विस्तार किती वेगाने होत आहे? तसेच विश्वाचा मोठा भाग व्यापणारे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी यांचे स्वरूप काय आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. या संशोधनाला आता युरोपियन स्पेस एजन्सीच्या युक्लिड अवकाश दुर्बिणीने गोळा केलेल्या नव्या माहितीची जोड मिळणार आहे. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी या दुर्बिणीने टिपलेला मोठ्या डेटामधील काही भाग प्रसिद्ध केला. या माहितीच्या आधारे शास्त्रज्ञांना विश्वातील आकाशगंगा आणि त्यांची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. तसेच विश्वाचा तपशीलवार त्रिमितीय नकाशा तयार करण्याच्या दिशेनेही मदत होणार आहे.

Loading content, please wait...