१.नियमित दिनचर्या ठेवा: अभ्यासाचे आणि इतर कामांचे एक निश्चित वेळापत्रक असणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यामुळे शरीराचे जैविक घड्याळ (biological clock) व्यवस्थित काम करते आणि शिस्त लागते.
कसे कराल: उठण्याची, झोपण्याची, जेवणाची आणि अभ्यासाची वेळ ठरवा.
२. शक्य तितका पौष्टीक आणि घरचा आहार घ्या: पौष्टिक आहार शरीराला ऊर्जा देतो आणि रोगांशी लढण्याची शक्ती देतो. बाहेरचे खाणे टाळून घरी बनवलेल्या किंवा विश्वासार्ह मेसमधील जेवणाला प्राधान्य द्या.
कसे कराल: शक्य असल्यास दोघातिघांनी मिळून घरच्या घरी जेवण बनवा आणि पौष्टीक खा