
(लेखक: सत्यजीत संदिपान हिंगे)
खेड (पुणे) तालुक्यातील आंतरजातीय विवाहानंतरचा हल्ला आणि वधूचे कथित अपहरण ही घटना केवळ स्थानिक गुन्हा नाही; ती भारतीय समाजाच्या जातीय मानसिकतेचे, परंपरागत ‘मान-सन्मान’ संकल्पनेचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावरच्या मर्यादांचे जिवंत उदाहरण आहे. या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उभा केला आहे २१व्या शतकातील लोकशाही भारतातही प्रेमाला जातीच्या कुंपणात का अडकवले जाते?