MPSC and UPSC Preparation: मी चार वर्षापासून एमपीएससीचे प्रिपरेशन करते आहे.. पुस्तकाची सर्व माहिती आहे, पाठांतर आहे, तरी माझा स्कोअर का येत नाही..? मी अनेक नोट्स काढल्या आहेत, त्या विषयाशी संबंधित अनेक पुस्तके देखील वाचली आहेत पण तरीही मला सातत्याने परीक्षेत अपयश का येते आहे..? नेमकं माझं काय आणि कुठं चुकतं आहे असा प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मंडळी विचारत असतात.
त्यासाठीच 'सकाळ स्टडीरूम' च्या माध्यामातून या विषयावर खास वेबिनार नुकतेच घेण्यात आले. या वेबिनारमध्ये पुस्तके कशी वाचावीत या विषयावर ज्ञानदिप अकादमीचे संचालक अॅड. महेश शिंदे सर यांनी मार्गदर्शन केले आहे. सकाळ प्लसच्या वाचकांसाठी या संपूर्ण वेबिनारची लिंक खाली बातमीमध्ये देण्यात आली आहे.