How to start study of UPSC and MPSC: मी ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी येण्याचा विचार करते आहे. मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे पण मला कुठून सुरूवात करावी ते कळेना. २२ वर्षीय सरिता तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. मैत्रिणीने देखील नुकतीच स्पर्धा परीक्षेची सुरूवात केली होती. तिला देखील त्या विषयातील पुरेशी माहिती नव्हती.
सरिता आणि तिच्या मैत्रिणींप्रमाणेच अनेक जण आहेत ज्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात करायची आहे पण कुठून आणि कशी सुरूवात करावी याविषयी काहीच माहिती नाही.
अशा विद्यार्थ्यांसाठीच दैनिक सकाळने पुण्यातील ज्ञानदीप अॅकडमी सोबत 'स्टडीरूम' नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थांसाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
स्टडीरूम काय आहे..? तर हा दर आठवड्याला ऑनलाइन पद्धतीने खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काढला जाणारा ई पेपर आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे स्टडी मटेरियल पेपर स्वरूपात मिळेल. या सोबतच प्रश्नोत्तरांचा तास, व्हॉट्स अॅप स्टडी ग्रुप, तज्ज्ञांच्या भेटी, ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष मार्गदर्शन, टॉपर्स कशा पद्धतीने अभ्यास करतात, ते कोणती खास स्ट्र्रॅटेजी वापरतात याची माहिती दिली जाणार आहे. तसेच करीयरचा प्लॅन बी काय असू शकतो, या विषयी देखील मार्गदर्शन केले जाणार आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून ज्ञानदीप अॅकडमीचे संचालक महेश शिंदे यांचे 'एमपीएस्सी आणि युपीएस्सी अभ्यासाची सुरूवात कशी करावी..?' या विषयावर नुकतेच एक वेबिनार आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी या अभ्यासादरम्यान वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका, नोट्स, वृत्तपत्र वाचन या विषयाची माहिती दिली. सुरूवातीच्या काळात कोणती पुस्तके वाचावीत, अभ्यासक्रम कसा समजून घ्यावा याविषयी सांगितले.