महेश शिंदे ( UPSC मार्गदर्शक व अभ्यासक)
राजस्थानमधील भाडला सोलार पार्कमध्ये जूनच्या भर दुपारी, इंजिनिअर असलेल्या कविताने तिच्या कंट्रोल रूममध्ये प्रवेश केला. त्याच वेळी तिच्या मोबाईलवर एक बातमी आली की, भारताने अखेर आपल्या वीज उत्पादन क्षमतेपैकी ५० टक्के हिस्सा जीवाश्मइंधनाव्यतिरिक्त अन्य इंधनातून पूर्ण केला आहे. तिच्यासारख्या देशातील लाखो नागरिकांसाठी ही फक्त बातमी नाही तर आशेचा किरण आहे. भारताचं शाश्वत ऊर्जेचं भविष्य आता सत्यात उतरतं आहे.