
India’s Nuclear Journey: From Tarapur to Net Zero 2070
लेखक : महेश शिंदे
भारताच्या ऊर्जाक्षेत्रात गेल्या काही दशकांत मोठे बदल झाले आहेत. भारतातील आजपर्यंतच्या वीज निर्मितीत कोळसा आणि जलविद्युत यांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. तसेच अलीकडच्या काळात सौर व पवन ऊर्जेनेही महत्त्वाचे स्थान मिळवले आहे.
पण या सर्व स्रोतांच्या काही मर्यादा समोर येऊ लागल्या आहेत. कोळशावर आधारित विद्युतनिर्मिती केंद्रांमुळे प्रदूषण वाढते आणि हवामान बदलाची समस्या गंभीर बनते. तर सौर आणि पवनऊर्जा हवामानावर अवलंबून असल्याने सतत व अखंड वीजपुरवठा शक्य होत नाही. म्हणूनच अणुऊर्जा भारतासाठी स्थिर, शाश्वत आणि दीर्घकालीन उपाय मानली जात आहे.