लेखक : स्वदेश घाणेकर
भारताच्या वाहन बाजारात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची ( electric vehicle ) मागणी वाढत चालली आहे आणि ही गोष्ट पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातीये. दिल्ली पाठोपाठ अनेक राज्यांमध्ये हवेचा दर्जा ढासळत असल्याने आता व्यवस्था ईव्हीकडे वळताना दिसत आहे.
नीती आयोग आणि आर्थर डी. लिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ''इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स (IEMI) 2024'' हा अहवाल प्रकाशित झाला. देशभरातील इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) वाढीचे आणि तेथील ठिकाणांचे मूल्यांकन करण्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण पाऊल आहे.