
England’s Industrial Revolution and India’s Industrialization – A Historical Comparison
(लेखक : विपुल वाघमोडे)
प्रश्न. औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये प्रथम का घडली? औद्योगिकीकरण काळातील लोकांचे जीवनमान स्पष्ट करा. त्याची तुलना आधुनिक भारतातील स्थितीशी करा. (२०१५,१५ गुण)
प्रस्तावना
औद्योगिक क्रांती ही १८ व्या शतकातील इंग्लंडमध्ये घडलेली अशी ऐतिहासिक प्रक्रिया होती, जिच्यामुळे उत्पादन, वाहतूक, वाणिज्य आणि समाजव्यवस्थेत मूलभूत बदल घडले. कृषिप्रधान समाजातून उद्योगप्रधान समाजात झालेला हा संक्रमण टप्पा केवळ इंग्लंडपुरता मर्यादित न राहता जगभर पसरला. परंतु ही क्रांती प्रथम इंग्लंडमध्ये का झाली, हे स्पष्ट करणे महत्वाचे आहे.