Premium|Study Room : सात महिन्यांनंतर इस्रोची यशस्वी भरारी; ईओएस–०५ उपग्रहाचे प्रक्षेपण

EOS-05 Successful Launch : इस्रोने सात महिन्यांनंतर पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ईओएस–०५ दहा वर्षे कार्यरत राहणार असून नैसर्गिक आपत्ती, शेती, जंगल आणि जमिनीतील बदलांवर लक्ष ठेवणार आहे.
EOS-05 Successful Launch

EOS-05 Successful Launch

esakal

Updated on

सुदर्शन कुडचे

अपयशानंतर सात महिन्यांनी इस्रोची यशस्वी भरारी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चार सप्टेंबर रोजी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून अंतराळ मोहिमांच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला. हा उपग्रह पूर्वी जीसॅट–१अ या नावाने ओळखला जात होता आणि आता त्याला ईओएस–०५ असे नाव देण्यात आले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भूस्थिर प्रक्षेपण वाहन एफ–१७च्या साहाय्याने पहाटे दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. जानेवारीतील प्रक्षेपणातील अपयशानंतर जवळपास सात महिन्यांनी झालेली ही मोहीम होती. उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीपणे पोहोचल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

नव्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाची गरज का भासली?

या मोहिमेचा संबंध दोन हजार एकवीसमधील अयशस्वी पृथ्वी निरीक्षण मोहिमेशी आहे. त्या वेळी ईओएस–०३ हा उपग्रह अपेक्षित कक्षेत पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी अधिक सक्षम उपग्रह विकसित करण्यात आला. नव्या उपग्रहाचा अपेक्षित कार्यकाळ दहा वर्षांचा आहे. मोठ्या प्रदेशाचे वारंवार निरीक्षण करणे हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती, शेती, जंगल आणि जमिनीवरील बदल यांचा मागोवा घेण्यासाठी या उपग्रहाकडून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com