जगदीप धनखड यांनी जयपूरच्या महाराजा कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयात बी.एस्सी (Hons) पूर्ण केली. त्यानंतर १९७८–७९ या कालावधीत राजस्थान विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएल.बी.) मिळवली. .जगदीप धनखड जन्म : १८ मे १९५१, किताना गाव, झुंझुनू जिल्हा, राजस्थान.व्यावसायिक जीवन ते १० नोव्हेंबर १९७९ रोजी राजस्थान बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून दाखल झाले आणि २७ मार्च १९९० रोजी राजस्थान उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील (Senior Advocate) म्हणून नियुक्त झाले.त्यांनी राजस्थान उच्च न्यायालय तसेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयात यशस्वी वकिली केली. याशिवाय, ते राजस्थान उच्च न्यायालय वकील संघाचे (Bar Council of Rajasthan )अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते..राजकीय कारकीर्द धनखड यांनी १९८९ मध्ये जनता दल पक्षातून निवडणूक लढवून झुंझुनू (राजस्थान) येथून लोकसभेचे खासदार म्हणून विजय मिळवला. पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संसदीय कार्य राज्यमंत्री (MoSPA) म्हणून एप्रिल ते नोव्हेंबर १९९० या काळात काम केले..१९९१ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजमेरमधून लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. नंतर त्यांनी किशनगड विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली आणि १९९३ ते १९९८ या काळात आमदार म्हणून कार्य केले.२००३ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आणि पक्षासाठी कायदेशीर सल्लागार आणि प्रवक्ते म्हणून काम पाहिले..उच्च घटनात्मक पदेपश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून ३० जुलै २०१९ ते १८ जुलै २०२२ पर्यंत ते पदावर होते.भारताचे १४ वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांनी ११ ऑगस्ट २०२२ रोजी पदभार स्वीकारला आणि २१ जुलै २०२५ पर्यंत जबाबदारी सांभाळली..स्वेच्छानिवृत्ती२१ जुलै २०२५ रोजी, आरोग्य कारणास्तव त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. मधल्या कार्यकाळात राजीनामा देणारे ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती ठरले.अधिक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या खास टिप्ससाठी सकाळ स्टडी रूम जरूर वाचा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.