
‘चकवाचांदण – एक वनोपनिषद’ हे त्यांचे आत्मचरित्र आजही निसर्गलेखनाच्या प्रगल्भतेचे उदाहरण म्हणून समोर ठेवले जाते.
‘जंगलाचं देणं’ (१९८५) या कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार व विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला.
‘रानवाटा’ (१९९१) या पुस्तकाला राज्य साहित्य पुरस्कार आणि भैरुरतन दमाणी पुरस्कार मिळाले. यातील ‘अरणी’ ही कथा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट झाली होती.
‘रातवा’ (१९९३) या कादंबरीला सुद्धा राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त झाला.
त्यांच्या २५ हून अधिक पुस्तकांमध्ये पक्षी, साप, वन्यप्राणी, आदिवासी जीवन आणि निसर्गाच्या विविध पैलूंवर आधारित सर्जनशील लेखन आहे.