Premium|Study Room : MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास कसा करावा?

MPSC Economics Study Material : MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ साठी सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अर्थशास्त्र विषयाचे महत्त्व वाढले असून नवीन वर्णनात्मक पॅटर्ननुसार सखोल आकलन, संकल्पना स्पष्टता आणि चालू घडामोडींवर आधारित विश्लेषणात्मक उत्तरलेखन शैली आत्मसात करणे आता अनिवार्य झाले आहे.
MPSC Economics Study Material

MPSC Economics Study Material

esakal

Updated on

लेखक : श्रीकांत जाधव

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ साठी सामान्य अध्ययन पेपर ३ (GS 3) मधील अर्थशास्त्र हा विषय अत्यंत निर्णायक आहे. नवीन वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपामुळे आता केवळ वस्तुनिष्ठ माहिती पाठ करून चालणार नाही, तर विषयाचे सखोल आकलन आणि विश्लेषणात्मक मांडणी आवश्यक आहे. या विषयाची तयारी करताना खालील रणनीती उपयुक्त ठरू शकते.

अभ्यासक्रमाचे सखोल आकलन आणि पायाभरणी

अर्थशास्त्राची तयारी सुरू करताना सर्वात प्रथम आयोगाचा सुधारित अभ्यासक्रम नीट समजून घेणे गरजेचे आहे. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, शासकीय वित्तव्यवस्था, समावेशक विकास आणि कृषी अर्थशास्त्र यांसारख्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. तयारीची सुरुवात करताना इयत्ता ११ वी आणि १२ वीची NCERTची पुस्तके तसेच राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तके वाचणे अनिवार्य आहे. यामुळे मूलभूत संकल्पना, जसे की जीडीपी, राजकोषीय तूट आणि चलनवाढ, यांमधील परस्पर संबंध स्पष्ट होतात. संकल्पना स्पष्ट असल्या की उत्तर लिहिताना भाषेचा ओघ कायम राहतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com