

MPSC Descriptive Exam Preparation
esakal
लेखक : अभिजित मोदे
एमपीएससी मुख्य परीक्षेच्या दृष्टीने भारतीय राज्यव्यवस्था हा एक महत्त्वाचा विषय आहे. पारंपरिक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर लक्ष केंद्रित करून, पूर्वीच्या प्रश्नांचा सराव आणि लेखन सराव यांचा समावेश असलेली रणनीती देण्याचा प्रयत्न या लेखात केला गेला आहे. ही रणनीती सोपी आणि प्रभावी आहे, जेणेकरून तुम्ही २०२५ च्या परीक्षेसाठी तयारी नीट करू शकाल.
या विभागात मूलभूत हक्क, केंद्र-राज्य संबंध, संघात्मक रचना, राष्ट्रपती, संसद, पंचायतराज, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक आणि बिगठनात्मक संस्था, आरपीए १९५१ आणि भारतीय घटनेची तुलना हे विषय आहेत. प्रथम ज्ञानदीप ऍकेडेमीच्या पुस्तकातील या विषयांचा अभ्यास करा आणि त्यांच्या नोट्स मराठीत तयार करा. प्रत्येक विषयासाठी महत्त्वाच्या कलमांची यादी बनवा, जसे की मूलभूत हक्कांसाठी कलम १२ ते ३५. दररोज एका विषयाचा सखोल अभ्यास करा आणि त्यावर आधारित दोन-तीन प्रश्नांची उत्तरे लिहा, जेणेकरून संकल्पना स्पष्ट होईल.