
आदित्य पोळ यांच्या राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव
ई सकाळ
MPSC State Service Interview 2023: Lessons for Future Aspirants
आदित्य तुकाराम पोळ (राज्यसेवा मुलाखत २०२३) (७४ गुण)
कालावधी - १५ ते १६ मिनिट
Date - १३ ऑगस्ट २०२४
प्रश्न : हा फोटो तुमचाच आहे का?
उत्तर : हो सर माझाच आहे.
प्रश्न : कसे आहात?
उत्तर : मी एकदम मस्त सर.
प्रश्न : जेवण केलत का?
उत्तर : सर नाश्ता केला आहे , जेवण interview नंतर करेन सर.
प्रश्न : मूळ ठाण्याचे का?
उत्तर : मूळ सांगलीचा (आटपाडी) आहे. २०१८ पर्यंत ठाणे येथे स्थायिक होतो. सध्या सांगलीला राहतो.
(Ok सांगली चे)