Vaibhav jadhav
Esakal
वैभव जाधव, साहाय्यक आयुक्त राज्यकर (ACST)
मानवी आयुष्यात स्वप्नांना खूप महत्त्व असते. मात्र स्वप्ने पाहणे जितके सोपे असते, तितकेच ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. संघर्ष, अडचणी आणि अपयश यांना न घाबरता पुढे चालत राहणाऱ्यांनाच शेवटी यशाचा मुकुट प्राप्त होतो, याची प्रचिती मला ३० ऑक्टोबर २०२६ या दिवशी आली. हा दिवस माझ्या स्वप्नांना आणि 10 वर्षांच्या संघर्षाला फळ देणारा ठरला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२४ मधून माझी संपूर्ण महाराष्ट्रातून २७ व्या क्रमांकाने राजपत्रित अधिकारी क्लास १ म्हणून सहाय्यक आयुक्त राज्यकर (Assistant Commissioner of State Tax - class 1) या पदावर निवड झाली... त्या दिवशी नाव यादीत दिसताच क्षणभर विश्वासच बसला नाही. संघर्षाच्या प्रत्येक दिवसाची त्यादिवशी किंमत मिळाली... स्वप्न, ध्येय आणि मेहनतीची सुंदर सांगड जुळून आली आणि यशाने आयुष्याला नवी ओळख दिली....