

MPSC
esakal
नाशिक : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाशिकमधील मविप्र समाजाच्या कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. 'सकाळ प्लस स्टडीरुम' व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.