Premium|Study Room : १२ कोटी भाविक, ३४ हजार कोटींचा निधी; कुंभमेळा नाशिकचा चेहरामोहरा बदलणार का?

Nashik Kumbh Mela 2027 Tourism and Economy : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात १२ कोटी भाविकांच्या आगमनाचा अंदाज असून, पर्यटन, स्थानिक रोजगार, व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण व्यवस्थापनासमोर मोठी आव्हाने उभी राहणार आहेत.
Nashik Kumbh Mela 2027 Tourism and Economy

Nashik Kumbh Mela 2027 Tourism and Economy

esakal

Updated on: 

कुंभमेळा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर साधू-संत, नागा साधू, अमृतस्नान आणि लाखो भाविकांची गर्दी उभी राहते. पण नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नाही. या निमित्ताने नाशिकचा चेहरामोहराच बदलण्याची तयारी सुरू आहे. तब्बल १२ कोटी भाविकांच्या स्वागतासाठी हजारो कोटींच्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. स्थानिक व्यवसायांना किती मोठी संधी मिळणार आहे? कुंभमेळ्यामुळे नाशिक जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येऊ शकेल का? दुसरीकडे, कोट्यवधी लोकांची गर्दी, गोदावरीचे प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान प्रशासन कसे पेलणार? विशेष म्हणजे, या संपूर्ण आयोजनात कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ड्रोनपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. आखाड्यांची परंपरा, नागा साधूंचे आगमन आणि या सोहळ्यामागचे अर्थकारण अशा कुंभमेळ्याच्या अनेक महत्त्वाच्या पैलूंसंबंधी सविस्तर जाणून घेऊया.

१. कुंभमेळ्याचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व!

कुंभमेळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली, हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला समुद्रमंथनाच्या पौराणिक कथेकडे जावे लागेल. देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले. त्यातून भगवान धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले. मात्र, हा अमृतकलश असुरांच्या हाती लागू नये म्हणून इंद्राचा मुलगा जयंत तो घेऊन पळाला. या धावपळीत अमृताचे काही थेंब पृथ्वीवरील चार ठिकाणी पडले. हीच ठिकाणे म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर.

या पौराणिक कथेला खगोलीय गणिताचीही जोड आहे. सूर्य, चंद्र आणि गुरू यांच्या विशिष्ट राशीस्थितीनुसार दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. गुरू आणि सूर्य सिंह राशीत आले की नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.

गोदावरीला दक्षिणेची गंगा म्हटले जाते. या काळात गोदावरीत अमृतस्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षाचा मार्ग खुला होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नाशिकच्या रामकुंडावर वैष्णव आखाड्याचे, तर त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर शैव आखाड्याचे साधू स्नान करतात.

२. १२ कोटी भाविक, हजारो कोटींची उलाढाल! स्थानिक व्यवसायांना मोठी संधी

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी मोठी संधी ठरणार आहे. या काळात सुमारे २७ हजार ते ३५ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे. या कुंभमेळ्यासाठी जवळपास १२ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. त्यांच्या अन्न, निवास, प्रवास आणि धार्मिक वस्तूंच्या खरेदीवर सुमारे ८ हजार ५०० ते ११ हजार कोटी रुपये खर्च होऊ शकतात. विशेष म्हणजे, या खर्चाचा फायदा केवळ मोठ्या व्यावसायिकांनाच नाही, तर छोट्या दुकानदारांपासून खाद्यपदार्थ विक्रेते आणि वाहनचालकांपर्यंत अनेकांना मिळणार आहे.

यासाठी धार्मिक वस्तूंची विक्री, खाद्यसेवा, निवास, मनोरंजन आणि वाहतूक या पाच क्षेत्रांवर लक्ष दिले जात आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून ३० हजारांहून अधिक जणांना मोफत कौशल्य प्रशिक्षणही दिले जात आहे. म्हणजेच, कुंभमेळा संपल्यानंतरही या आयोजनातून उभ्या राहिलेल्या पायाभूत सुविधांचा फायदा नाशिकच्या पर्यटनाला होऊ शकतो.

Loading content, please wait...