Premium|Study Room : MPSC-UPSC चालू घडामोडी २०२६

Praggnanandhaa Norway Chess Champion : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा २०२६ मध्ये आर. प्रज्ञानंधाने ऐतिहासिक विजेतेपद पटकावत भारताला पहिल्यांदाच हा किताब मिळवून दिला, तर जागतिक बुद्धिबळात भारतीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले.
Praggnanandhaa Norway Chess Champion

Praggnanandhaa Norway Chess Champion

esakal

Updated on

लेखक : प्रतीक बाबर

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा २०२६ ही या अत्यंत प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धेची १४ वी आवृत्ती होती. बुद्धिबळ विश्वात या स्पर्धेला विशेष स्थान आहे, कारण यामध्ये जगातील सर्वोत्तम ग्रँडमास्टर्स आमनेसामने येतात. भारताच्या दृष्टीने ही स्पर्धा ऐतिहासिक ठरली, कारण एका भारतीय खेळाडूने पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

स्पर्धेची मूलभूत माहिती

कालावधी: २५ मे ते ५ जून २०२६
ठिकाण: ओस्लो, नॉर्वे (Oslo, Norway)
स्वरूप: एकूण ६ खेळाडूंमध्ये 'डबल राउंड-रॉबिन' (Double Round-Robin) पद्धतीने ही स्पर्धा खेळवली गेली.
अर्मागेडॉन पद्धत (Armageddon Format): नॉर्वे चेसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, जर क्लासिकल गेम ड्रॉ (Draw) झाला, तर लगेचच 'अर्मागेडॉन' (टायब्रेकर) गेम खेळवला जातो. यामुळे प्रत्येक राउंडमध्ये एक विजेता निश्चित मिळतो.

२०१३ मध्ये सुरुवात झाल्यापासून तब्बल १४ वर्षे ही स्पर्धा प्रामुख्याने नॉर्वेच्या 'स्टॅव्हेंजर' (Stavanger) या शहरात किंवा त्याच्या आसपासच्या परिसरात आयोजित केली जात होती. त्यामुळे बुद्धिबळ जगतात 'नॉर्वे चेस' आणि 'स्टॅव्हेंजर' हे समीकरण पक्के झाले होते. परंतु, २०२६ मध्ये या परंपरेला छेद देत स्पर्धा पहिल्यांदाच देशाची राजधानी ओस्लो येथे आयोजित करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com