
मे २०२५ मध्ये MSC ELSA 3 हे लायबेरियन ध्वज असलेले कंटेनर जहाज कोचीच्या किनाऱ्यापासून सुमारे ३८ नॉटिकल मैलांवर बुडाले. ही केवळ एक दुर्घटना नव्हती. या दुर्घटनेत केवळ जहाज आणि कंटेनर्सचे नुकसान झाले नाही तर समुद्र आणि जैविक परिसंस्थेचेही फार नुकसान झाले आहे.
या जहाजात ६४० हून अधिक कंटेनर्स होते ज्यात कॅल्शिअम कार्बाइड, हायड्राझीन आणि हायड्रॉक्सिलअमाइन यांसारखी अत्यंत धोकादायक रसायने आणि सुमारे ४५० टन फर्नेस ऑईल व डिझेल होते.