

Competitive Examination Guidance Programme
esakal
राजगड ज्ञानपीठ संचलित राजगड टेक्निकल कॅम्पस (अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक) येथे 'ग्रीन क्लब असोसिएशन'च्या वतीने 'पर्यावरण शाश्वतता मोहीम' (Environmental Sustainability Drive) आणि 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन' या संयुक्त कार्यक्रमाचे दिमाखात आयोजन करण्यात आले. मार्गदर्शन करताना श्री. वैभव जाधव यांनी बदलत्या परीक्षा पद्धती, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि नवीन अभ्यासक्रमावर सविस्तर प्रकाश टाकला.