

Goa nightclub fire incident 2025
esakal
गोव्यात ६ डिसेंबरला एका नाईट क्लबमध्ये घडलेली मोठी आग दुर्घटना आणि २५ लोकांचा मृत्यू ही केवळ एका राज्यापुरती मर्यादित घटना नाही, तर संपूर्ण देशासाठी गंभीर इशारा आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोनुसार भारतात दरवर्षी अंदाजे १.६ लाख आगीच्या घटनांची नोंद होते, परिणामी २७ हजारहून अधिक लोकांचे मृत्यू होतात. भारतातील शहरे आणि गावांमध्ये आगींच्या घटना सातत्याने वाढत आहेत. व्यापारी संकुलांना लागणारी आग, निवासी इमारतींमधील शॉर्ट सर्किट, कारखाने, गोदामे, रुग्णालये किंवा बाजारपेठांतील आगी या सर्व घटना आता नेहमीच्या झाल्या आहेत. गोव्यातील ही दुर्घटना स्थानिक शोकांतिका नसून, अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनातील उणिवा अधोरेखित करणारी आहे.