Premium: Science and Skepticism: प्रत्येक शोधामागे एक जिज्ञासा असते, म्हणून विज्ञानात शंका महत्वाची!
संशयवादीच खरा वैज्ञानिक
परिचय (Intoduction)
"विज्ञान म्हणजे फक्त पुस्तकातली उत्तरं नाही, तर प्रश्न विचारण्याची हिंमत. १८४० च्या दशकात इग्नाझ सेमेलवेसने हात धुण्याच्या साध्या कृतीवरून वैद्यकीय जग बदललं. कारण त्याने ''सर्वांना माहीत असलेल्या'' गोष्टीवर शंका घेतली. गॅलिलिओने दुर्बिणीतून आकाश पाहिलं आणि पृथ्वी केंद्रस्थानी आहे, हा समज मोडला. अशा संशयवादी मनांनीच विज्ञानाला पुढे नेलं. संशय हेच वैज्ञानिक प्रगतीचं खरं इंजिन आहे आणि हा लेख त्याच भूमिकेचा शोध घेतो."
मुख्य युक्तिवाद (Thesis) :
संशयामुळे प्रगती (६०%) जुन्या समजुतींना आव्हान (ऐतिहासिक आणि वैद्यकीय बदल)
कोपरनिकस/गॅलिलिओ : पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे, असा समज होता. त्यांनी शंका घेतली, निरीक्षण केलं आणि सूर्य-केंद्रित मॉडेल सिद्ध केलं.
व्हेसेलियस : गॅलेनच्या प्राचीन वैद्यकीय समजुतींवर (प्राण्यांवर आधारित) शंका घेतली. थेट मानवी शवविच्छेदन करून शतकानुशतकांच्या २००+ चुका दुरुस्त केल्या.
डार्विन : प्रजाती ईश्वराने बनवल्या, त्या बदलत नाहीत, असा विश्वास होता. त्याने शंका घेतली. HMS बीगल प्रवासात निरीक्षणं केली आणि नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला.
सेमेलवेस : आजार हवेतून पसरतो, असं मानलं जायचं. त्याने शंका घेतली, डॉक्टरांच्याच हातांमुळे संसर्ग होतो हे पाहिलं आणि हात धुण्याची पद्धत आणली.