Premium|Study Room : शुभम तिजारे यांचा प्रेरणादायी प्रवास; वाईट परिस्थितीतून उभारी घेत MPSC यश

Shubham Tijare MPSC Success : संघर्ष आणि जिद्दीचा विजय: यवतमाळच्या शेतकऱ्याच्या मुलाची MPSC मध्ये बाजी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शुभम तिजारे बनले महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेचे (CAFO) सहाय्यक संचालक; वाचा एक प्रेरणादायी यशोगाथा.
Shubham Tijare MPSC Success

Shubham Tijare MPSC Success

esakal

Updated on

लेखक : शुभम तिजारे (सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ)

वाईट परिस्थिती माणसाला खचवत नाही, तर त्याला अधिक सक्षम बनवते. या वास्तवाला प्रत्यक्ष अनुभवत आणि जगत आलेला मी तुमच्यातलाच एक सामान्य माणूस आहे, ज्याने स्वतःच्या क्षमतांवर विश्वास आणि संयम ठेवून आपली वेळ बदलली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये माझी सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ (CAFO Class-1) या पदावर निवड झाली. स्वतःला सिद्ध करण्याचा माझा दीर्घ संघर्ष एका टप्प्यावर संपला. मात्र हा संघर्ष फक्त माझ्यापुरता नव्हता. माझे आई-वडील, गुरुजन आणि मित्रपरिवार या सर्वांचा तो सामूहिक प्रवास होता. शेवटी आयुष्याची ही लढाई आम्ही सर्वांनी मिळून जिंकली.

ही लढाई केवळ Class-1 अधिकारी होण्यासाठी नव्हती. ती लढाई होती स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची, स्वतःला घडवण्याची, स्वतःच्या मर्यादा ओलांडत पुढे जाण्याची आणि शेतात राबणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाला न्याय देण्याची. अखेर ते साध्य झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com