
The Hidden Psychological Cost of Social Media Addiction
E sakal
लेखक : सत्यजित हिंगे.
डिजिटल युगात सोशल मीडिया ही केवळ संवादाची साधने राहिलेली नाहीत, तर ती आजच्या मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या प्लॅटफॉर्मनी जग जवळ आणले, पण या आभासी जगाने माणसाला मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या एकाकी करून टाकले आहे, ही चिंताजनक वस्तुस्थिती आहे.